Ad will apear here
Next
‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास प्रारंभ
पुणे : ‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास सोमवारी बेलावडे (ता. मुळशी) येथे प्रारंभ करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरुड, एन्व्हायर्नमेंट​ल क्लब ऑफ ​इंडिया या संस्थांनी या अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लायन्स’ आणि ‘एन्व्हायर्नमेंटल’च्या वतीने ​​प्लास्टिक ​समस्या सोडविण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याला पाच रुपये हमी भाव देण्यात येणार आहे. ​

‘लायन्स’चे माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, कोथरूड लायन्स क्लबचे अध्यक्ष नागेश चव्हाण, सरपंच ​कल्पना जंगम, ​गट विकास अधिकारी ​डॉ. स्मिता पाटील, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ ​इंडियाचे अध्यक्ष नीलेश इनामदार, ​प्रकल्प प्रसार प्रमुख ललित राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

प्लास्टिक वापराबद्दल प्रबोधन, प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया अशी या अभियानाची वैशिष्टये आहेत. सामुहिक प्रयत्नातून हा तालुका देशातील पहिला प्लास्टिक कचरामुक्त तालुका करण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला.

फत्तेचंद रांका यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कोथरूड लायन्स क्लबचे काशीनाथ येनपुरे, माजी सरपंच धैर्यशील ढमाले, माजी सभापती बाबा कंधारे, अभय शास्त्री ​आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZPZBH
Similar Posts
पुणे सराफ असोसिएशनतर्फे शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुणे : पुणे सराफ असोसिएशनतर्फे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने १५ शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. नीतू मांडके सभागृहात हा कार्यक्रम झाला
खासदार शिरोळेंच्या हस्ते कोळावडे गावातील रस्त्यांचे भूमिपूजन पुणे : जिल्ह्यातील कोळावडे या गावातील तीन रस्त्यांचे भूमिपूजन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव खासदार अनिल शिरोळे यांनी दत्तक घेतले आहे. या योजनेमधील हे तिसऱ्या टप्प्यातील गाव आहे. या आधी या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील वडगाव शिंदे, कासारी ही गावे दत्तक घेण्यात आली आहेत
पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे आयोजन पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, पुणे सराफ असोसिएशन आणि स्टायलस इव्हेन्ट्स इंडिया यांच्या वतीने पाचव्या ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो २०१९’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’च्या ‘एनएसएस’चे भुकुम येथे श्रमसंस्कार शिबिर पुणे : वारजे येथील आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट् कँपस व नऱ्हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स यांच्या विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) मुळशी तालुक्यातील भुकुम गाव येथे चार ते दहा जानेवारी २०१९ या कालावधीत निवासी श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language